प्रेरणा सभा

साधारण एक वर्षाचा प्रेरणा सभांचा प्रवास एक दिव्य शक्ती होती .यातून उभा राहिला  प्रचंड लोकसहभाग आणि बघता बघता एक एक करत पूर्ण केंद्र डिजीटल झाले.
१) माझी पहिली डिजीटल शाळा झिरवे .ही शाळा डिजीटल करताना मुख्याध्यापक श्री जगन वाडीले यांनी २००००रु आणि मी स्वत; १००००रु  असे ३००००रु दुकानदारास देवून  श्री .जितेंद्र पाटील सर जि .प.शाळा साळवे , श्री.सतीश शिंदे जि .प.शाळा निकुंभे  यांच्या मदतीने आणि ओळखीने उधार डिजीटल चे साहित्य घेवून डिजीटल  शाळा केली .उदघाटनाच्या वेळी आम्हाला गावकरी कडून मोठी मदत मिळाली त्यातून उधारीचे पैसे परत केले .
२) दुसरी शाळा रामी .रामीच्या  शिक्षक वृन्दानी ७५% रक्कम  स्वताची पदरमोड करून जमविले .बापूसाहेब गावचे सरपंच श्री बापूसाहेब महाजन यांनी १०,०००रु दिले .
३) टाकरखेडा गावाचे सरपंच श्री.धिरजभाऊ गिरासे यांनी  रु.५०,००० /-रोख  दिले .आणि झटपट शाळा डिजीटल झाली
४ ) निमगुळ गाव मोठे या उक्ती प्रमाणे निधी हि मोठा जमा झाला .दिनांक १९.१०.२०१५ रोजी लोकसहभागातून  विकासासाठी प्रेरणा सभेचे आयोजन करण्यात आले.प्रेरणा सभेसाठी शिक्षण विभागा मार्फत डायट प्राचार्या मा.विद्याताई पाटील , शिक्षणाधिकारी सो .( प्राथमिक )मा .मोहनजी देसले साहेब ,गटशिक्षणाधिकारी सो.पंचायत समिती शिंदखेडा मा .मनिषजी पवार साहेब , तालुका संपर्क अधिकारी मा.शिवाजी  ठाकूर  साहेब , माजी सभापती मा .दादासो.रघुविरजी बागल अध्यक्ष वा सदस्य SMC निमगुळ ,सरपंच व सदस्य ग्रा.पं. ,आणि गावातील सर्व पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते  यांच्या उपस्थितीत सभा झाली एकाच रात्रीतून १.५० लाख रु .निधी गोळा झाला .आणि त्यातून शाळा  डिजीटल झाली.
५) धावडे हे गाव देखील  मोठेच मात्र पैसे मोठ्या प्रमाणात जमा होतील याची शाश्वती नव्हती .परंतु धावडे चे शिक्षकांचा उत्साह मोठा होता आणि जिद्द खूप होती त्या ठिकाणी देखील पैशांचा पाऊस च पडल्या सारखे झाले  आणि  दिनांक १3.१०.२०१५ रोजी घेतलेल्या प्रेरणा सभेतून १.५० लाख रु .निधी गोळा झाला .आणि त्यातून शाळा  डिजीटल झाली.  सभेसाठी शिक्षण विभागा मार्फत , तालुका संपर्क अधिकारी मा.शिवाजी  ठाकूर  साहेब , साळवे  शाळेचे आदर्श शिक्षक श्री .जितेंद्र पाटील सर , बोरकुंड चे श्री.सतिश जोशी सर यांच्या उपस्थितीत , अध्यक्ष  व सदस्य SMC धावडे  ,सरपंच व दस्य ग्रा.पं. ,आणि गावातील सर्व पदाधिकारी , सामाजिक कार्यकर्ते  यांच्या उपस्थितीत सभा झाली एकाच रात्रीतून १.५० लाख रु .निधी गोळा झाला .आणि त्यातून शाळा  डिजीटल झाली.
६ ) पथारे गाव तसे लहान तरी पण साधारण चांगली
७ ) वडदे गावात दिनांक १७.१०.२०१५ रोजी लोकसहभागाचा पहिला प्रयत्न रात्रीची प्रेरणा सभा घेतली .प्रेरणा सभा अतिशय उत्तम झाली .संपूर्ण गाव प्रेरणा सभेसाठी हजर होते .सभा ग्रामस्थांना खूप आवडली मात्र कोणतीही आर्थिक मदत या सभेमधून मिळाली नाही .तरीही नाराज न होता .पुन्हा मुख्याध्यापक व शिक्षकांशी चर्चा केली. आणि लोकसहभागा साठीचा दुसरा प्रयत्न   मुख्याध्यापक व शिक्षकांनी घरोघर जावून पालकभेटी घेवून लोकसहभाग मिळविण्यासाठी प्रयत्न केला यातून पण अपयशच आले .पुन्हा एकदा निराश न होता मुख्याध्यापक सहविचार सभेत चर्चा करून केंद्रातील १० शिक्षकांची टीम बनविली त्यात ५ महिला शिक्षिका व ५ पुरुष शिक्षक असतील असे नियोजन केले .
८ ) चावळदे येथे दिनांक १७.१०.२०१५ रोजी लोकसहभागाचा पहिला प्रयत्न रात्रीची प्रेरणा सभा घेतली .प्रेरणा सभा अतिशय उत्तम झाली .संपूर्ण गाव प्रेरणा सभेसाठी हजर होते .सभा ग्रामस्थांना खूप आवडली मात्र कोण


वडदे  शाळेसाठी  door to door पद्धतीने लोकसहभागाचा प्रयत्न करताना निमगुळ केंन्द्रातील शिक्षक बंधू भगिनींची अनमोल मदत झाली .